दक्षिणेत रूढ असलेली मंडल पूजा राम मंदिराच्या निमित्ताने उत्तर भारतात घडणार आहे. प्राणप्रतिष्ठा झाल्यावर २४ जानेवारीपासून मंडल पूजा सुरु होऊन ४८ दिवस पुढे चालेल. या पूजेत सर्वात आधी गणपती बाप्पाला आवाहन केले जाते. दररोज रामलल्लाला चांदीच्या कलशातून अभिषेक केला जाईल. विद्वान आचार्य चतुर्वेदासह दिव्य ग्रंथांची पारायणे करतील. या पूजेने श्रीहरी प्रसन्न होतात अशी श्रद्धा आहे. पूजेदरम्यान ४८ दिवस उपवास ठेवतात. सतत ईश्वराचे ध्यान केले जाते. ही पूजा पेजावर मठाचे पीठाधीश जगद्गुरू मध्वाचार्य विश्व प्रसन्न तीर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली होईल.
पुढारी २१/१२/२३