निवडणूक आयोगाकडून खर्चाची मर्यादा व दरपत्रक जाहीर

13 Mar 2024 10:54:50
 
निवडणुका म्हटले की उमेदवारांकडून वारेमाप खर्च केला जातो. मतदारांना पैशांचे आमिष दाखविण्यापासून ते सढळ हाताने पैसे खर्च केले जातात. त्यामुळेच निवडणुकीमध्ये पैशांचा मोठ्या प्रमाणात होणारा वापर बघता  निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चाची बंधने घालून दिली आहेत. त्यानुसार लोकसभेसाठी उमेदवार म्ह्नणून  खर्चासाठी  ९५ लाख रुपयांपर्यंत मर्यादा घालून देण्यात आली आहे. तसेच निवडणुकीत उमेदवारांकडून विविध बाबींवर होणाऱ्या खर्चाला लगाम घालण्यासाठी आयोगाने दरनिश्चिती केली आहे. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा करून हे दर निश्चित करण्यात आले असून (दि.१२) त्याची घोषणा करण्यात आली.
पुढारी १३/३/२४
Powered By Sangraha 9.0