दहशतवादी म्होरक्याचा पाकमध्ये संशयास्पद मृत्यू

04 Mar 2024 11:22:32
 
पाकिस्तानातून भारतविरोधी कारवाया करणाऱ्या आणखी एका दहशतवादी म्होरक्याचा संशयास्पद मृत्यू झाला. शेख जमील उर रेहमान असे त्याचे नाव असून खैबर पख्तूनवा प्रांतातील अबोटाबाद शहरामध्ये त्याचा मृतदेह सापडला. तो मूळ काश्मीरमधील पुलवामाचा असून 'युनायटेड जिहाद कौन्सिल' या दहशतवादी संघटनेचा स्वयंघोषित सरचिटणीस होता. तो पाकिस्तानची गुप्तचर संस्था 'आयएसआय'च्या इशाऱ्यावरून कारवाया करीत होता.
४/३/२४ महाराष्ट्र टाईम्स 
Powered By Sangraha 9.0