कोलकाता- देशातील पाण्याखालून जाणाऱ्या पहिल्या मेट्रोचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार, ६ मार्च रोजी उद्घाटन केले. पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात एस्पलेड-हावडा मैदान भागात ही मेट्रो हुगळी नदीतील पाण्याखालून बांधलेल्या बोगद्यातून धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. या भुयारी मार्गात सहा स्थानके आहेत. त्यातील चार स्थानके ही भुयारी आहेत. देशात एखाद्या नदीखाली सर्वात खोल बांधलेला बोगदा अशी या बोगद्याची ओळख आहे.
सध्या पाण्याखालील मेट्रो मार्ग फक्त लंडन आणि पॅरीसमध्येच आहेत.
लोकमत ७ /३/२४