पंतप्रधान मोदींनी समुद्र तळाशी जाऊन द्वारका नगरीचे दर्शन घेतले

11 Apr 2024 10:23:25
 
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेट द्वारकेला जोडणाऱ्या भारतातील सर्वात मोठा केबल ब्रिज सुदर्शन पुलाचे उद्घाटन केले, मग मंदिरात जाऊन भगवान द्वारकाधीशाचे दर्शन घेतले. त्यानंतर मोदींनी  समुद्रात तळाशी जाऊन, जलमय झालेल्या द्वारका नगरीचे दर्शन घेतले व भगवान श्रीकृष्णाची प्रार्थना केली.
     यदुकुलवंशी भगवान श्रीकृष्ण यांच्या परलोक गमनानंतर द्वारका नगरी समुद्रात बुडाली होती. ज्या स्थानी द्वारका नगरी असल्याचे सांगितले जाते,तिथेच समुद्राच्या तळाशी एक शहर मिळाले. जलमय झालेल्या भग्नावस्थेत असलेल्या त्या शहराची भव्यता आजही जाणवते.
समुद्रतळाशी जाऊन द्वारका नगरीचे दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''पाण्यात बुडालेल्या द्वारका नगरीत जाऊन प्रार्थना करण्याचा अनुभव अत्यंत दिव्य होता. मला अध्यात्मिक वैभव व शाश्वत भक्ती असलेल्या प्राचीन युगाशी जोडले गेल्याची अनुभूती झाली. भगवान श्रीकृष्णाने आम्हा सर्वांना आशीर्वाद द्यावा.''

ऑपइंडिया स्टाफ़ २०२४
Powered By Sangraha 9.0