खिर्डी , तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर- येथील शेतकरी सखुबाई दत्तू धोतरे या गेल्या चाळीस वर्षांपासून स्वत:च्या शेतीतील भाजीपाल्याची गाव परिसरातील आठवडी बाजारात थेट विक्री करतात. असे केल्यामुळे चार पैसे अधिक मिळू शकतात असा त्यांचा अनुभव आहे. भाजीपाला विक्रीतून कुटुंबाची आर्थिक घडी बसवत त्यांनी शेतीला नवी दिशा दिली. चरितार्थ भागवून उरलेल्या पैशातून
धोतरे कुटुंबीयांनी घर बांधले व आणखी शेती विकत घेतली.
अॅग्रोवन७/४/२४