शिरपूरमध्ये मुसलमान तरुणीकडून हिंदू तरुणींच्या वशीकरण प्रयत्न

17 May 2024 11:23:52
 
  शिरपूर येथील करवंद नाक्याजवळ 'बालाजी लेडीज हॉस्टेल' या मुलींच्या वसतीगृहात एका मुसलमान तरुणीने हिंदू मुलीचे नाव धारण करून ३ हिंदू तरुणींवर वशीकरण करण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट या तिघींपैकी एका हिंदू तरुणीला समजल्यानंतर तिने याविषयीची माहिती हिंदुत्वनिष्ठांना दिली. पोलिसांत तक्रार करताच मुसलमान तरुणी पसार झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
१. 'हिंदू तरुणींवर वशीकरण करून त्यांचे धर्मांतर करणे, धर्मांधाच्या कह्यात हिंदू तरुणींना सोपवून 'लव्ह जिहाद' घडवणे', असे षडयंत्र मुसलमान तरुणीने रचले होते.
२.  शिरपूर, चोपडा आणि आणखी एका गावातील तरुणी अशा एकूण ३ हिंदू तरुणींशी जवळीक साधून तिने कागदावर लिखाण केलेले वशीकरणाचे साहित्य त्यांच्या बॅगेत गुपचूप ठेवले.
३. हा प्रकार 'द केरला स्टोरी'  चित्रपटात दाखवलेल्या घटनेनुसार असल्याची चर्चा आहे. चोपडा येथील एका हिंदू तरुणीच्या निदर्शनास हा प्रकार आला.
सुदर्शन १३/४/२४

Powered By Sangraha 9.0