बीजिंग- अरुणाचल प्रदेश जणू आपल्याच मालकीचा असल्याच्या थाटात चीनने येथील ३० ठिकाणांची नावे बदलली आहेत. ११ रहिवासी भाग, १२ टेकड्या, ४ नद्या, १ तलाव आणि डोंगरातून निघणारा मार्ग यांची नावे बदलण्यात आली आहेत. ही नावे चिनी, तिबेटी व रोमन भाषेतून प्रसिद्ध करण्यात आली. एखाद्या देशाला एखाद्या ठिकाणाचे नाव बदलायचे असल्यास त्याला संयुक्त राष्ट्रे जागतिक भौगोलिक माहिती व्यवस्थापन विभागाला त्याची माहिती द्यावी लागते. तेथील तज्ज्ञांनी भेट दिल्यानंतर हा बदल मंजूर होतो व नोंदवला जातो. परंतु अरुणाचल प्रदेशामध्ये 'पंतप्रधान आवास योजने अंतर्गत शहरी भागात ७ हजार, ४२६, तर ग्रामीण भागात ३२ हजार, ९०० घरांची निर्मिती करण्यात आली असून, ४ लाख, ५० हजार, ९६४ जन-धन खातीही तेथील नागरिकांनी उघडली आहेत. 'उज्ज्वला योजने' च्या लाभार्थ्यांची संख्या ५३ हजार, ७९१ आहे, तर 'जलजीवन मिशन योजने'अंतर्गत २ लाख, २८ हजार, ५६६ घरांना नळजोडणी मिळाली आहे. तसेच पायाभूत सोयीसुविधांच्या बाबतीतही अरुणाचल प्रदेशमधील एकूणच प्रगती थक्क करणारी आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये २०१४ ते २०२४ या काळात 'प्रधानमंत्री ग्रामसडक योजने' तून १ लाख, १८ हजार ९५० किमीचे रस्ते नव्याने बांधण्यात आले. तसेच आसाम ते अरुणाचलप्रदेशाला जोडणाऱ्या 'सेला' बोगद्याचेही नुकतेच लोकार्पण करण्यात आले. यामुळे भारतीय सैन्याला चीनी सीमेपर्यंत पोहोचणेही सुकर झाले आहे. मुंबई तरूण भारत ३/४/२४