रणदीप हुड्डाची ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ फिल्म सेंसॅार बोर्डाने रोखली होती

04 May 2024 10:25:09
 
       अभिनेता रणदीप हुड्डा यांनी महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या  जीवनावर फिल्म बनवली आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ फिल्मचे दिग्दर्शन ही त्यांनीच केले आहे. सखोल अभ्यास करून, भरपूर कष्ट घेऊन त्यांनी ही  फिल्म बनवली आहे. काळ्या पाण्याच्या शिक्षेच्या काळातील प्रसंगात जिवंतपणा यावा म्हणून रणदीप हुड्डा यांना आपले शरीर अत्यंत दुबळे बनवावे लागले होते. अशी बातमी समजते आहे की, ही फिल्म सेन्सॉर बोर्डाने अडवली होती,  त्यामुळे ती कधी प्रदर्शित होईल हे सांगता येत नव्हते.  
         फिल्म व्यवसायातील माहितगार सुमित काडेल हे ट्वीटमध्ये म्हणतात, “माझ्या बऱ्याच सूत्रांकडून मला समजले आहे की, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या फिल्मला सेन्सॉर बोर्डाने जाणूनबुजून रोखले आहे. ज्यामुळे तिचे अनेक शो रद्द करावे लागले. ही  फिल्म रिलीज होण्यासाठी अडचणी निर्माण करणाऱ्या व प्रदर्शित होण्याचा अधिकार नाकारणाऱ्या संबंधित  संस्थांवर कारवाई झाली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने होईल.”  
       सुमित काडेल म्हणाले की, ''कलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आणि फिल्म निर्मितीची प्रक्रिया अखंड चालू रहावी म्हणून तिच्या रक्षणासाठी सातत्याने झगडावे लागणार आहे.'' त्यांनी शंका बोलून दाखवली की, हिंदी सेन्सॉर बोर्डने प्रदीर्घ काळ ही फिल्म रोखून धरल्यामुळे मराठीसाठी अर्ज करायला वेळच मिळाला नाही. त्यामुळे ही फिल्म मराठीत रिलीज करणे शक्य झाले नाही. सावरकर महाराष्ट्रातील असल्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या मराठी लोकांची संख्या फार मोठी आहे.या बातमीनंतर संतप्त झालेल्या लोकांनी केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा आग्रह केला.
           आजही सेन्सॉर बोर्डवर डाव्या विचारसरणीच्या लोकांचा पगडा आहे. मागील काही आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. डाव्या विचाराचे लोक सावरकरांचे कट्टर विरोधक असतात आणि ते सावरकरांनी देशासाठी केलेला त्याग मानायला तयार नसतात. सावरकर हे हिंदुत्ववादी होते, हेच त्यांचे दुःख आहे.  
             ऑपइंडिया स्टाफ़ २१.३.२४            
   


 

 

Powered By Sangraha 9.0