स्नो लेपर्ड ब्रिगेडमधील कॅप्टन गीतिका कौल यांनी इतिहास रचला आहे. त्या जगातील सर्वात उंच युद्धभूमी, सियाचीन येथे तैनात होणारी भारतीय लष्कराची पहिली महिला वैद्यकीय अधिकारी ठरल्या आहेत. त्यांनी सियाचीन बॅटल स्कूलमधून खडतर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर त्यांची निवड झाली. कॅप्टन गीतिका यांचे उल्लेखनीय समर्पण, क्षमता, अडथळे पार करण्याची आणि राष्ट्रसेवेत झोकून देण्याची भावना इतरांना प्रेरणा देण्यासाठी एक उदाहरण आहे असे भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सने नमूद केले.
पुढारी ६/१२/२३