सुभाषित

SV    11-Jul-2024
Total Views |
 
वसन्ते त्वं वाणीरसितरसिके कोकिलकुले ।
शरत्काले लक्ष्मिर्दिशिदिशि लसत्पद्मनिवहे ।।
अपर्णा हेमन्ते खलु गलितपर्णेषु तरुषु ।
विलोके त्वां मातः सततमभितोदैवतमयीम् ।।

हे भारतमाते, वसंत ऋतूत रसिकांना रमविणाऱ्या कोकिळ- समूहात तुला मी वाणी (सरस्वती) रूपात पाहतो. शरदकाळात दिशादिशात फुलणाऱ्या कमळांमध्ये लक्ष्मीरूपात मी तुला पाहतो. हेमंत ऋतूत पर्णहीन झालेल्या वृक्षांमध्ये अपर्णारूपात मी तुला पाहतो. मी तुला असे सदैव, सर्वत्र देवता स्वरूपात पाहतो.
राष्ट्रस्तवनांजली