शिक्षणाचा हेतू

18 Jul 2024 10:42:32
 
 'योग्य प्रयत्नांतून सामाजिक सुधारणा शक्य असते', या तत्त्वावर आधारित अशी भूमिका शिक्षणाने घेतली की शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे महत्त्वाचे साधन ठरते आणि शिक्षणाचा संपूर्ण कार्यक्रमच सामाजिक पुनर्रचनेच्या दृष्टीने आखला जाऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांपुढे नवसमाज निर्मितीची दिशा स्पष्ट मांडणे आणि समाजपरिवर्तनाची मूल्ये त्यांच्या मनावर ठसविणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट बनते. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अर्थातच शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरते. शिक्षक  सामाजिक पुनर्रचना व परिवर्तनाची  तळमळ असणारे  असावेत. ते  स्वतः सुजाण व कर्तव्यदक्ष नागरिक हवेत. सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्रीय प्रगतीसाठी योग्य दृष्टी आणि क्षमता असलेले शिक्षक ही राष्ट्राची महत्त्वपूर्ण संपत्ती आहे.                
   भारतीय शिक्षण, मे २४
Powered By Sangraha 9.0