१११६ मध्ये बेंगरूळूच्या होयसळ राजवंशीयांनी बांधलेले चेन्नाकेशव मंदिर हे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत दर्शवणाऱ्या कलाकृतींनी भरलेले आहे. या मंदिरात मोहिनीच्या मुख्य मूर्तीसह अन्य मूर्तीही आहेत. मोहिनी हे भस्मासुराला मारण्यासाठी विष्णूने घेतलेले स्त्रीरूप होते. मोहिनी हे अदृश्य आकर्षणाचे प्रतिक आहे. इथे विष्णूच्या या रुपाला नाभी नाही. अनेक ठिकाणी नक्षीकामातून गुरुत्वाकर्षणाची ओढ दाखवली आहे.
मोहिनीच्या एका हातातून बांगडी खाली येते, तर वर उचललेल्या पायातील पैंजण खाली झुकलेले आहे. येथील सरस्वतीदेवीची मूर्ती गुरुत्वाकर्षण रेषेचे ज्ञान लक्षात घेऊन बनवली आहे. या मूर्तीच्या मस्तकावर पाण्याचे थेंब पडले तर ते नाकाच्या खालून उजवीकडून येऊन उजव्या हाताच्या तळहातावरून डाव्या पायाच्या तळव्यावर पडतात आणि तिथून उजव्या पायावर पडतात. हे पाणी पसरत नाही तर थेट खाली पडते ते गुरुत्वाकर्षणामुळे!!
१७ सप्टेंबर २०२२ रोजी या मंदिराच्या बाहेरील एका उंच लोखंडी खांबावरील चेंडू खाली पडला आणि काही वेळातच तिथे हलकासा भूकंप झाला. या खांबाखालचा दगड तीन बाजूंनी जमिनीला टेकलेला असून एका बाजूने वर आहे. तो हजारो वर्षे असाच उभा आहे. भूकंप आल्यावर खांबाचा मधला भाग फिरू शकतो आणि त्यावर असलेल्या घंटा वाजू शकतात अशी रचना आहे. भूकंप मोजणारे अलीकडचे 'सिस्नोग्राफ' हे यंत्र भूमीला घट्ट जोडलेले नसते, जसा हा खांब आहे. भारतीय संस्कृती आणि स्थापत्त्यकला किती पुढारलेले होते याचा हा पुरावा आहे.
सनातन प्रभात २१.४.२४