हिमाचल प्रदेशातील मनोरम कुलू- मनाली पर्वतराजीत राहणाऱ्या लोकांची महादेवी आणि इथल्या शासकांची देवी हिडींबा कुलदेवता आहे. हि म्हणजे अंबा. डि म्हणजे वनी आणि अंबा म्हणजे दुर्गा. हिडींबा ही वनदुर्गा आहे. हे मंदिर प्राचीन आहे.
१५५३ च्या सुमारास तत्कालीन शासक महाराजा बहादूरसिंह यांनी सध्याचे मंदिर घडवले. मंदिरात महिषासुरमर्दिनीची श्रीरुपात पूजा केली जाते. मंदिरात एक गुंफा आहे तिथे उतरून गेल्यावर एका प्राचीन शिळेवर पदचिन्हे आहेत. ती देवी हिडींबेची समजून त्यांची पूजा केली जाते.
हे मंदिर धुंगरी वनात असल्याने त्याला धुंगरी मंदिर असेही म्हणतात.पाषाणाच्या उंच खांबांवर देवदार वृक्षाच्या लाकडातून हे मंदिर बांधले आहे. तिबेटी बौद्ध पॅगोडा शैलीत याचे बांधकाम आहे.
ज्येष्ठ कृष्ण प्रथमा हा देवी हिडिंबेचा जन्मदिन म्हणून साजरा करतात. त्यावेळी धुंगरीच्या वनात तीन दिवस यात्रा भरते. संगीत,नाट्य, नृत्याचा उत्सव असतो.
महाभारत काळात भीमाने हिडींबेशी विवाह केल्याचा आणि घटोत्कच हा त्यांचा पुत्र असल्याचा उल्लेख आहे.
उगता भारत २०.४.२४