शोषखड्ड्याच्या पाण्यावर पिकवली शेती

SV    10-Sep-2024
Total Views |
 
 जळगाव : यावर्षी वाढत्या तापमानाने व पाण्याच्या नागरिकांना दुर्भिक्ष्याने सर्वच हैराण झाले  आहे. नदी, नाले, तळी आटली तर  विहिरींनी तळ गाठला आहे. अशा स्थितीतून कसे सावरावे, हाच प्रश्न शेतकऱ्यासह सर्वांनाच पडला. अशावेळी  सहज सोपा व अत्यल्प खर्चाच्या शोषखड्ड्याचा प्रयोग शेतीची   तहान भागवणारा ठरला आहे. या प्रयोगाने शेतकरी स्वतःसह इतर शेतकऱ्यांनाही जलसमृद्ध करू शकतो.  महाराष्ट्रातील हा वेगळा प्रयोग पाचोरा तालुक्यातील नगरदेवळ्याचे शेतकरी नामदेव महाजन यांनी आपल्या शिवारात  केला आहे.
शोषखड्डयावरच असलेली जमीन नेहमीप्रमाणे उत्पन्न देत असल्याने दुहेरी फायदाही होत असल्याचे महाजन यांनी सांगितले . प्रचंड  उन्हाळ्यातही महाजन यांच्या शेतातील विहीर अर्धा फूटही कमी झालेली नाही तर चारही कूपनलिका सुरू करण्याची वेळ आली नसल्याचे त्यांनी सांगितले. महाजन यांनी जम्बो शोषखड्ड्याचा प्रयोग करून पाहिला अन् त्याचा दुहेरी फायदा झाला.  
नेमका प्रयोग समजून घेऊया....
शेतकरी नामदेव महाजन यांनी आपल्या शेतशिवारात आजवर अनेक प्रयोग केले होते. कितीही प्रयत्न केले तरी शेततळ्याचे बाष्पीभवन होत असे. यासाठी त्यांनी ४ बाय ४ चौरस गुंठा क्षेत्रात २० फूट खोल खड्डा खोदला. १ फूट जाड वाळूचा थर, २ फूट काळा कोळशाचा थर व पुन्हा १ फूट वाळूचा थर अंथरून उर्वरित सर्व पोकळी शेतातील सुपीक मातीने भरली. जमीनक्षेत्र समतल केले. त्यापासून जवळच दोन खड्डे खोदून त्यात २०० लिटरच्या पाण्याच्या टाक्या जागोजागी छिद्रे पाडून बसवल्या असून त्यातील पाणी शोषखड्ड्यातील दगडी थरापर्यंत जाण्यासाठी दोन पाइप जोडले आहेत.
या टाक्यांपासून ३०० ते ४०० मीटर अंतरावर जवळून गेलेल्या नाल्यापासून टाक्यापर्यंत दीडफुटी चर खोदून त्यातही खडी व वाळू ओतली. नाल्याचा वाहून जाणारा स्रोत, त्यात ७ फूट दगडी थर व त्यावर ३ टाक्यांच्या माध्यमातून शोषखड्डा पावसाळ्यात भरला जातो. शिवाय पावसाळ्यात चारही महिने पाणी शोषखड्ड्याद्वारे जमिनीत खोलवर झिरपत राहिल्याने हा संपूर्ण परिसर पाणीदार झाला आहे.
लोकमत २३.४.२४