ज्वाला माता मंदिर आणि अकबर काय सत्य ?
एकदा आम्ही मित्रमंडळी हिमाचल प्रदेशमधील पालमपूरच्या मार्गाने ट्रेकिंगसाठी जात होतो. वाटेत भगवती ज्वालामातेचे प्रसिद्ध मंदिर लागले. जे कांगडा पासून ३० कि.मी.वर एका नदीच्या किनाऱ्यावर आहे. आम्ही विचार केला जाताना भगवती मातेचे दर्शन घेऊन पुढे जाऊ या.
मंदिर अतिप्राचीन असून ते हिंदुंच्या ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे. मंदिरात एकही मूर्ती नाही. एका मोठ्या दालनातील वेगवेगळ्या नऊ ठिकाणातून ज्वाळा सतत प्रकट होत असतात. त्याला माता भगवतीचे स्वरूप समजून त्याचे पूजन केले जाते.
या मंदिराच्या संबंधात अनेक कथा सांगितल्या जातात. परंतु मंदिराबाहेर लावलेला फलक वाचून मला आश्चर्य वाटले. त्यावर लिहिले होते की, एकदा अकबर इथे आला होता. त्याने आपल्या माणसांना मंदिरातील ज्वाळा विझवण्यास सांगितले. त्या ज्वाळा काही करून विझल्या नाहीत, तेव्हा मातेच्या चमत्काराने प्रभावित झालेला अकबर बादशाहा अनवाणी मातेच्या दर्शनासाठी आला. मातेच्या मंदिरावर सोन्याचे छत्र चढवले आणि शंभर बिघा जमीन दान दिली.
माझा त्या फलकावर लिहिलेल्या माहितीवर विश्वास बसत नव्हता. म्हणून मी तेथील पुजारी, अन्य अधिकारी यांना याविषयी विचारले, पण प्रत्येकाने एकच उत्तर दिले की, हेच सत्य आहे. मला माहिती होते की अकबर हा मूर्तीभंजक होता. त्याने हिंदू धर्म संपवण्याचे अनेकदा प्रयत्न केले होते. त्यामुळे तो क्रूर जिहादी हिंदुंच्या श्रद्धास्थानाचा आदर करेल, हे शक्यच नव्हते.
जो अकबर आपल्या अहंकारी आणि जिहादी वृत्तीमुळे मेवाडला उद्ध्वस्त करण्याचे मनसुबे आखतो, जो एका दिवसात चितोड किल्ल्याजवळ ३० हजार सामान्य नागरिकांची केवळ हिंदू आहेत म्हणून कत्तल करू शकतो, तो हिंदुंच्या श्रद्धास्थानावर छत्र चढवेल, यावर विश्वास ठेवता येईल का ?
मी माझे शंका निरसनाचे कार्य चालू ठेवले. माझे मित्र पालमपूर हॉटेलात निघून गेले, मी मात्र सत्याच्या शोधार्थ बाहेर पडलो. बरेच प्रयत्न करूनही हाती काही लागत नव्हते. तेव्हा तेथे सुरक्षाव्यवस्थेत असलेल्या भारतीय सैन्यातून निवृत्त झालेल्या सुरक्षारक्षकाची भेट झाली. तो मला त्याच्या घरी घेऊन गेला आणि म्हणाला की, “ मला यातील फार काही कळत नाही पण मी तुम्हाला एका विद्वान माणसाचा पत्ता देतो. त्यांना भेटा, त्यांच्याकडून तुम्हाला काहीतरी सत्य नक्की समजेल.”
त्याने दिलेला पत्ता हा प्रा.भारद्वाज यांचा होता, त्यांचे गाव पालमपूरपासून जवळ होते. मी त्या गावात रात्री पोचलो. मी पावसात चिंब भिजलो होतो. सुरुवातीला प्रा.भारद्वाज यांना वाटले की, मी काही मदतीसाठी आलो आहे. पण जेव्हा मी त्यांना मंदिरातील फलकावर लिहिलेल्या माहितीबाबत विचारले, तेव्हा ते थोडे अस्वस्थ झाल्यासारखे जाणवले. त्यांनी माझी चौकशी केली. त्यांची खात्री पटल्यावर त्यांनी मला घरात घेतले. मला कपडे बदलायला दिले. थोडे गरम दूध व गूळ देऊन माझ्या थंड पडलेल्या शरीरात थोडी उब आणली.
प्रा. भारद्वाज हे निवृत्त प्राध्यापक होते. त्यांनी इतिहासावर प्रबंधही लिहिलेला होता. त्यांनी मला मंदिराचा इतिहास सविस्तरपणे समजावून सांगितला. ते म्हणाले की, “हे सत्य आहे की, नुरपूर व चंबावर हल्ला करायला आला होता तेव्हा अकबर ज्वाला मंदिरात आला होता. त्याने तेथील ज्वाळा विझवण्याचा प्रयत्नही केला. पाण्याचा प्रवाह मंदिरात आणूनही तो ज्वाळा विझवू शकला नाही. तेव्हा त्याने मंदिराचा विध्वंस केला आणि तो निघून गेला.
अकबराने ज्वाला मंदिर पूर्णपणे नष्ट केले, तेथील सेवेकरी तसेच पुजाऱ्यांची हत्या केली आणि ज्वाला स्थानावर मोठमोठ्या शिळा टाकून, ते दडपून तो निघून गेला. त्यानंतर चंबाचे राजे संसारचंद यांनी मंदिर पुन्हा बांधले. महाराज रणजीतसिंह यांनी नंतर त्यावर सोन्याचे छत्र लावले. काही काळानंतर महाराजांचे पुत्र शेरसिंह यांनी मुख्य प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्याने सजवले.”
मी त्यांना मंदिरात लावलेल्या फलकाबद्दल विचारले, तेव्हा ते म्हणाले की, ''तो फलक म्हणजे हिंदुंचा षंढपणा आहे. तो मोठा खोटारडेपणा आहे. सरकारी आदेशाने तो फलक तेथे लावण्यात आला आहे. हिंदू मुसलमानातील बंधुभाव वाढवण्यासाठी आणि अकबर कसा महान होता हे दाखवण्यासाठी रचलेला तो डाव आहे. ''
निखिलेश शांडिल्य Quora