विमानशास्त्र

SV    04-Sep-2024
Total Views |
 
 'भारतात विमानशास्त्र अस्तित्वात होते का?' या प्रश्नाचे उत्तर उज्जैनच्या संस्कृत विद्यापीठात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना इस्त्रोचे सध्याचे अध्यक्ष डॉ.सोमनाथ यांनी 'हो' असे दिले आहे.  यापूर्वी  १९७४ साली बंगलोरच्या विज्ञान संस्थेतील शास्त्रज्ञांच्या चमूने 'बृहत विमानशास्त्र' या ग्रंथावर संशोधन करून एक प्रबंध सादर केला होता. त्यात 'हा ग्रंथ प्राचीन नाही, यातील आकृत्यांप्रमाणे विमान तयार केल्यास ते उडू शकणार नाही आणि यातील मिश्र धातूंचे वर्णन अवैज्ञानिक आहे' असे निष्कर्ष काढले व ते स्वीकारले गेले. त्यामुळे यादृष्टीने प्राचीन भारतीय विमानशास्त्राचा अभ्यास नंतर झालाच नाही.
२०१५ साली बोडस या व्यावसायिक वैमानिकाने मुंबईत भरलेल्या सायन्स कॉंग्रेसच्या अधिवेशनात या विषयावर एक प्रबंध सादर केला. जो वादग्रस्त ठरला.
मात्र हैदराबादच्या काव्या वड्डाडी या तरुण एरोनॉटीक्स इंजिनिअर मुलीने 'बृहत विमानशास्त्र' या ग्रंथातल्या एका विमानाची आकृती निवडून त्याचा अभ्यास करून एक 3D मॉडेल बनवले. ते हवेत उडू शकते का याची विंड टनेल टेस्ट करण्यासाठी बंगलोरच्या काही प्रतिष्ठित वैज्ञानिक संस्थांमध्ये तिला नकार मिळाला.नाउमेद न होता तिने ते मॉडेल २०१७ साली अमेरिकेतल्या आर्यविन, कॅलिफोर्निया विद्यापीठ इथे पाठवले. याचा पूर्ण व्हिडीओ उपलब्ध असून तो कोणालाही पाहता येतो. हे मॉडेल हवेत अलगद उचलले जाते आणि हवेत स्थिर राहते हे आपण पाहू शकतो.
ही टेस्ट करणारे एरोनॉटीक्स इंजिनिअर डॉ. ट्रेविस टेलर यांनी 'This model of Aeroplane is Aerodynamically Perfectly Balanced असा शेरा दिला. यानंतर काव्याने केलेल्या इतर प्रतिकृतीची  विंड टनेल टेस्ट करण्याची तयारी इस्त्रोने दाखवली आहे.
महर्षी भारद्वाज यांच्या कालखंडा-  आधी विमानशास्त्र विषयावर सात ग्रंथ लिहिले गेले होते. त्यांची नवे- १. नारायणकृत-विमानचंद्रिका  २.  शोनककृत-  व्योमयानतंत्र ३. गर्गकृत- यंत्रकल्प    ४. वाचस्पतीकृत-यानबिंदू ५. चाक्रायणीकृत-व्योमयान प्रदीपिका ६. धुंदीनाथकृत-व्योमयान ७. अगस्तीकृत-अगस्त्य विमानसंहिता.
व्योम म्हणजे आकाश. व्योमयान म्हणजे आकाशात उडणारे यान – विमान. या सर्व ग्रंथांचा आधार घेऊन महर्षी भारद्वाजांनी 'बृहत विमानशास्त्र' हा ग्रंथ लिहिला. याचा अर्थ प्राचीन भारतात विमानशास्त्र प्रगत  अवस्थेत होते.
      प्राचीन भारतातील विज्ञानयुग-सतीश कुलकर्णी