पुण्यात सैन्य दिनाच्या संचलन परेडचं आयोजन

16 Jan 2025 10:41:41
 


पुणे (Pune) शहरात काल पहिल्यांदाच ‘सेना दिवस परेड'चं (sena diwas parade) आयोजन करण्यात आलं. १५ जानेवारी रोजी देशभरात सैन्य दिनाचं आयोजन केलं जातं. त्या निमित्ताने पुण्यात आयोजित केलेली परेड, बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप अँड सेंटर (बीईजी) येथे आयोजित करण्यात आली होती. सकाळी ७ वाजता सुरू होणारी ही परेड ११ वाजेपर्यंत सुरु होती. या वर्षीच्या परेडमध्ये विविध नवकल्पना आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन झाले. महिला अग्निवीरांचे पथक, आर्मी सर्व्हिस कॉर्प्सचे घोडेस्वार पथक, तसेच ड्रोन आणि रोबोटिक्ससह उन्नत तंत्रज्ञानाचे प्रदर्शन हे या परेडचे मुख्य आकर्षण होते. परेडचे नेतृत्व मेजर जनरल अनुराग विज यांनी केले. पुण्यातील नागरिकांसाठी हा एक अभिमानास्पद क्षण होता. ज्याद्वारे त्यांना भारतीय सैन्याच्या समृद्ध इतिहासाची आणि आधुनिक क्षमतांची झलक पाहायला मिळाली.   

एनडीटीव्ही मराठी १५/०१/२५
Powered By Sangraha 9.0