कथा एका प्रत्यावर्तनाची- हिंदू ते इस्लाम आणि पुन्हा हिंदू !

18 Jan 2025 17:15:54
 

कथा एका प्रत्यावर्तनाची- हिंदू ते इस्लाम आणि पुन्हा हिंदू !

‘मी इस्लाम का स्वीकारला व सनातन धर्मात का परतले? हीच या पुस्तकाची tagline आहे असे म्हणता येईल. प्रत्यावर्तन म्हणजे ‘घरवापसी’. ओ.श्रुती हिचा हिंदू ते इस्लाम आणि नंतर इस्लाममधून सनातन धर्मात केलेला प्रवेश याचा प्रवास या पुस्तकात आहे. केरळमधील एका हिंदू ब्राह्मण कुटुंबात श्रुतीचा जन्म झाला. ती त्यांच्या घरातील सर्वात लहान मुलगी. आपल्या धर्माबद्दल तिला फारशी माहिती नव्हती तसेच तिला जे आपल्या धर्माबद्दल प्रश्न पडत, त्याची उत्तरं तिच्या आईवडिलांकडे नव्हती. शाळेत शिकत असताना तिच्या वर्गात असणाऱ्या तिच्या मुस्लिम मैत्रिणींकडे मात्र त्यांच्या धर्माबद्दल संपूर्ण माहिती होती. त्यामुळे श्रुतीला त्यांचा धर्म सोपा तसेच चांगला वाटू लागला. दिवसातून पाचवेळा नमाज अदा करणे,इस्लाम संबंधित दिनचर्येचे पालन करणे आवश्यक आहे हे समजल्यावर इस्लाम धर्माचा अभ्यास करावा असे श्रुतीला मनापासून वाटू लागले. आणि मग त्याचे पालन करता करता तिची मजल धर्मांतर करण्याइतपत गेली. आपल्या आईवडिलांचा विरोध झुगारून श्रुती घरातून निघून गेली.

हिंदू हेल्पलाईन कार्यकर्त्यांच्या मदतीने श्रुतीच्या आईवडिलांनी तिला शोधले, आणि तिला समुपदेशनासाठी हिंदू परिषदेच्या कार्यालयात आणले. तोवर तिने आपले नाव बदलून रहमत असे ठेवले होते. संवादातून, चर्चेतून तिला मुस्लिम धर्माचा फोलपणा लक्षात आला आणि तिने मुल्सिम धर्माचा त्याग करून सनातन धर्माचा स्वीकार केला. आजच्या काळातील हा ज्वलंत विषय असल्यामुळे हे पुस्तक सर्वांनी वाचावे असेच आहे. 

कथा एका प्रत्यावर्तनाची : मूळ लेखिका ओ.श्रुती, मराठी अनुवाद : ए.आर.नायर/ जे.ए.थेरगावकर.

Powered By Sangraha 9.0