१० डिसेंबरच्या 'हिंदू न्याययात्रा' कशासाठी?

18 Jan 2025 13:11:24
 
  •   १० डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिवस आहे.  जागतिक मानवाधिकार परिषदेने हिंदुंवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची कधीच दखल घेतलेली नाही.
  •   बांगलादेशात हिंदुंवर आणि अन्य अल्पसंख्य समुदायावर अनन्वित अत्याचार होत आहेत. संयुक्त राष्ट्र आणि मानवाधिकार परिषद यावर सोयीस्कर दुर्लक्ष  करत आहेत.
  •   बांगलादेशात हिंदू संत, मंदिरे, हिंदू संस्था असुरक्षित असून दररोज हल्ले होत आहेत.  
  •   भारत सरकार जागतिक पातळीवर बांगलादेशी हिंदुंच्या रक्षणासाठी प्रयत्न करत आहे. त्याला हिंदुंच्या दबावामुळे यश येईल.
  •   हिंदू बांधवांवर जगात कुठेही अन्याय झाला तर त्याचा हिंदू समाजाकडून तीव्र निषेध आणि विरोध होईल हा संदेश पूर्ण जगात जाणे आवश्यक आहे.  
  •   हिंदू समाज भारतात बहुसंख्य असला तरी जागतिक पातळीवर आपण अल्पसंख्य आहोत त्यामुळे संयुक्त राष्ट्राने गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.  या पार्श्वभूमीवर बांगलादेशातील आपल्या बांधवांना वाचवण्यासाठी प्रत्येक गावात, शहरात, तालुक्यात आंदोलन करून एकजूट दाखवायचे ठरले.
  •   “संकटात हिंदू, तर मदतीला कोटी बंधू” हा संदेश देशात आणि जगात गेला पाहिजे! हिंदू समाज यापुढे कोणताही अन्याय, अत्याचार सहन करणार नाही!!
  •   बांगलादेशी हिंदू बांधवांसाठी एक व्हा! हिंदुंना न्याय मिळालाच पाहिजे!! जयोस्तु हिंदुत्व, जयोस्तु भारत बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अमानुष अत्याचारांविरोधात आवाज उठवण्याची वेळ आली आहे!
हिंदू संत चिन्मय कृष्ण महाराज यांच्या अटकेसह, महिला अत्याचार, मंदिरे उद्ध्वस्त करणे, आणि हिंदुंवरील धार्मिक छळाच्या अनेक घटनांमुळे समाजाची स्थिती गंभीर बनली आहे.
दुर्दैवाने देशातील काँग्रेस, कम्युनिस्ट आणि तथाकथित पुरोगामी विचारांचे लोक या गंभीर प्रश्नावर सोयीस्कर मौन बाळगून आहेत. हिंदू समाजाच्या वेदनांवर हा संवेदनाहीन दृष्टीकोन निंदनीय आहे.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन दिनांक १० डिसेंबर याचे औचित्य साधून त्या दिवशी जगभरातील हिंदुंनी दहशतवादी इस्लामिक शक्तींच्या विरोधात, हिंदुंच्या न्याय्य मानवी हक्कांसाठी शांततापूर्ण 'निषेध मोर्चे' काढले.

विश्वसंवाद केंद्र, औरंगाबाद, ९.१२.२४
Powered By Sangraha 9.0