हिंदू मंदिरांनंतर आता जैन गुंफांवर दिला हिरवा रंग !

23 Jan 2025 18:36:12
 


तमिळनाडूतील मदुराई येथील पवित्र थिरुपरनकुंद्रम ही टेकडी भगवान मुरुगन यांच्या सहा  निवासस्थानांपैकी एक आहे. येथे एक शिवमंदिर आहे. या टेकडीवर बकऱ्या आणि कोंबड्यांचा बळी देण्याच्या तयारीत मुसलमान आहेत. भगवान मुरुगन राहत असलेल्या टेकडीला भेट दिल्यानंतर आययूएमएल खासदाराने मांसाहारही केला. आययूएमएलची काँग्रेसबरोबर युती आहे.

दरम्यानयाच टेकडीवर ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात बांधलेल्या जैन लेण्यांना हिरव्या रंगाने रंगवल्याचे  प्रकरण  समोर आले आहे. या लेण्यांमध्ये ब्राह्मी लिपीतील शिलालेख आहेत. ही लेणी पुरातत्व विभागाकडून  संरक्षित आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी गुहांमधील हिरव्या रंगाबाबत तक्रार दाखल केली आहे. आता त्याची चौकशी सुरू आहे.  टेकडीचे नाव थिरुपरकुंद्रम ऐवजी सिकंदर हिल असे  बदलण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.


ऑपइंडिया २३.१.२५

Powered By Sangraha 9.0