महाकुंभातील ‘नेत्रकुंभ’

25 Jan 2025 14:35:37
 

       ५ जानेवारी रोजी प्रयागराज इथे गंगा नदीच्या पवित्र तटावर भव्य ‘नेत्रकुंभाचे उद्घाटन झाले. महाकुंभात स्नानासाठी येणारे भाविक इथे नि:शुल्क तपासणी करून घेऊ शकतात. ‘सक्षम कडून लावलेल्या या नेत्रकुंभाचे उद्घाटन जुना पीठाधीश्वर महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद यांच्या उपस्थितीत झाले. उद्घाटक डॉ.गोपाल कृष्ण म्हणाले, सर्व देशवासियांनी नेत्रदानाचा संकल्प करावा. अंध व्यक्तींच्या जीवनात त्यामुळे उजेड निर्माण होईल. भारतापेक्षा छोटा असलेल्या श्रीलंका देशात नेत्रदानाचे प्रमाण मोठे आहे. येत्या १५ ते २० वर्षात आम्ही संपूर्ण देशभरातील दृष्टीहिनांच्या आयुष्यात उजेड आणू, असा विश्वास आम्ही या नेत्रकुंभाच्या माध्यमातून व्यक्त करीत आहोत.


पांचजन्य १९.१.२५

Powered By Sangraha 9.0