उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये ५०० लोकांचे धर्मांतर झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, परतापूर परिसरातील शंकरनगरमध्ये ५०० जणांचे धर्मांतर करण्यात येत होते. याची माहिती मिळताच हिंदू रक्षा दल, किसान मंच, हिंदू जागरण मंचच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. कार्यकर्त्यांच्या या गोंधळानंतर पोलिसांनी १५ जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणी १२ जणांविरुद्ध निनावी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी गेल्या पाच वर्षांपासून लोकांना पैसे व इतर गोष्टींचे आमिष दाखवून धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत होते.
घटनास्थळी ख्रिश्चन पुस्तकेही सापडली
याबाबत भारतीय किसान मंचचे प्रदेशाध्यक्ष गौरव पराशर आणि हिंदू रक्षा दलाचे जिल्हा प्रभारी अंकुर शर्मा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, परतापूर शंकरनगर फेज वन येथील एका घरात साउंड प्रूफ हॉल बांधण्यात आला होता. शंभराहून अधिक लोकांचे धर्मांतर होत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता येथे धर्मांतरासाठी महिला, पुरुष व लहान मुले जमा झाल्याचे दिसून आले.
अवध प्रहरी डिसेंबर २४