नवी दिल्ली : मालमत्तेच्या विभाजनाशी संबंधित एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले की, केवळ मुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्याने हिंदू व्यक्तीचा धर्म आपोआप बदलत नाही. लग्नानंतर महिलेने धर्म बदलला नसल्याने तिला तिच्या वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळू शकतो, असेही न्यायालयाने म्हटले आहे. २००५ मध्ये हिंदू वारसा हक्क दुरुस्ती कायदा लागू झाल्यानंतर, मुलींनाही त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेत हक्क मिळत आहे.
पुढारी २५.०१.२५