पुणे- वाघोली : अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वर्षपूर्तीनिमित्त वाघोलीतील वाघेश्वर मंदिरासह इतर धार्मिक स्थळांवर दीप प्रज्वलन करत दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी वाघेश्वर मंदिर, प्रभू श्रीराम मंदिर, हनुमान मंदिर परिसर दिव्यांच्या लखलखाटाने उजळून निघाला होता. यावेळी परिसरामध्ये भव्य अशी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यामध्ये ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
लोकमत २५.१.२५