बचत गटातील महिला होणार सायबर साक्षर

27 Jan 2025 17:35:23
 


             पुणे- मागील काही दिवसात सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्रामीण भागातील महिला बचत गटाच्या सदस्यांना सायबर सुरक्षेसाठी जागरूक करणे आणि डिजिटल व्यवहार सुरक्षित करणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामीण विकास यंत्रणा
,जिल्हा परिषद आणि एम.के.सी.एल.यांच्या वतीने महिला साक्षर अभियान राबवण्यात येणार आहे.

 जिल्ह्यातील उमेद अभियानांतर्गत ६८ महिला प्रभाग संघांशी जोडलेल्या २६ हजार बचत गटातील महिलांना हे प्रशिक्षण मिळेल. या महिलांची संख्या सुमारे अडीच लाख आहे.

ऑनलाईन बँकिंग, डिजिटल व्यवहार आणि सोशल मिडीयाचा वापर वाढल्याने फसवणुकीचा धोका वाढला आहे. तसेच महिलांचा सायबर छळ आणि ट्रोलींगचा धोका वाढला आहे. ओ.टी.पी. शेअर करणे आणि लिंकवर क्लिक करून वैयक्तिक माहिती दिल्यानेही अनेक महिलांची फसवणूक होते. या कारणांमुळे ग्रामीण महिलांना सायबर सुरक्षेविषयी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.

प्रत्येक गावातील एम.के.सी.एलचे अध्ययन केंद्र महिला बचत गटांना हे प्रशिक्षण देईल.

सकाळ २५.१.२५ 

Powered By Sangraha 9.0