मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील कटात सहभाग

28 Jan 2025 14:37:01
 

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील कटात सहभाग

वॉशिंग्टन - २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील कटात सहभागी तहब्बूर राणा याची पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आली आहे. त्याच्या प्रत्यार्पणाचा निर्णय अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. त्याला भारतात आणण्याच्या मार्गातील कायदेशीर अडथळे आता दूर झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी २१ जानेवारी रोजी न्यायालयाने हा निकाल दिला.

तहब्बूर राणाला सध्या लॉस एंजलिसमधील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवले आहे. पाकिस्तानचा मूळ रहिवासी असलेला व कालांतराने अमेरिकेचे नागरिकत्व पत्करलेला दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीचा तहव्वूर राणा साथीदार आहे. २००८ साली मुंबईवर झालेल्या हल्ल्यात सहा अमेरिकी नागरिकांसह १६६ जणांचा मृत्यू झाला होता.


लोकमत २६.१.२५

 

Powered By Sangraha 9.0