देशाची अणुऊर्जा दुपटीने वाढली

28 Jan 2025 12:35:30
 
     भारताचे अणुभट्ट्यांमधून होणारे ऊर्जा उत्पादन जगाच्या तुलनेत दुप्पट वेगाने वाढत आहे. ब्रिटनच्या एनर्जी इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार, २०२३ मध्ये भारताच्या अणुभट्ट्यांमधून ऊर्जा उत्पादनात ४.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर जगभरातील क्षेत्रात २.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
     भारत सरकारने जुलैमध्ये अणुऊर्जेची क्षमता वाढवण्याची योजना जाहीर केली होती, त्यानुसार भारताची अणुऊर्जा क्षमता २०३१-३२ पर्यंत ८,१८० MW वरून २२,४८० MW वर नेण्याची योजना आहे. अणुऊर्जा उत्पादनात भारताचा जागतिक वाटा २०२३ मध्ये १.७६ टक्क्यांवर पोहोचला आहे, जो गेल्या ५५ वर्षांतील सर्वाधिक आकडा आहे.
    एनर्जी इन्स्टिट्यूटच्या आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये भारताचे अणुऊर्जा उत्पादन ४८.२ टेरावॅट तास (TWh) होते, जो एक नवीन विक्रम आहे. २०२३ मध्ये जगभरातील सरासरी अणुऊर्जा उत्पादन प्रति तास २,७३७.७ टेरावॅट होती. अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर म्हणाले की, भारतात ऊर्जेची मागणी वाढत आहे. हवामान बदलामुळे शुद्ध ऊर्जेसाठी वेगाने काम सुरू आहे.
दैनिक भास्कर ०९.०१.२५
Powered By Sangraha 9.0