कुंभमेळ्यात मुस्लिमांची दादागिरी
प्रत्येक भारतीयाच्या मनात एक पुण्यकर्म, धर्मकार्य आणि अन्य संस्कारांच्या संदर्भात एक आस्था असते. या आस्थेच प्रकट रूप आपल्याला कुंभांच्या रूपाने संगमांवर पाहायला मिळते. भारतीय संस्कृती, सनातन धरोहर आणि अर्थव्यवस्था या सगळ्यांना एका सूत्रात आणणारी एक सनातन, पुरातन व्यवस्था म्हणजे कुंभमेळा. भगवान विष्णूच्या कूर्मावतारापासून महाकुंभाचे आयोजन होते, असे अनेक कथांमधून सांगितले जाते. अमृतकुंभ मिळवण्यासाठी जे युद्ध झाले त्यात हे अमृत प्रयागराज, उज्जैन, नाशिक आणि हरिद्वार येथे सांडले. तेव्हापासून या चार ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन सुरु झाले असे म्हणतात. यावरूनच हजारो वर्षांपासून चालत आलेला हा मेळा आहे, हे सहजच समजून येते. या वर्षी बारा वर्षांनी १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी म्हणजे संक्रांत ते महाशिवरात्रीपर्यंत उत्तरप्रदेशातील प्रयाग येथे महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कुंभात गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या या त्रिवेणी संगमावर डुबकी मारण्यासाठी जवळपास ४०-४५ करोड लोक इथे येतील असे अनुमान लावण्यात येत आहे. गंभीर बाब अशी कि, कुंभमेळा ज्या ठिकाणी भरणार आहे, ती जागा वक्फ बोर्डाची आहे असा दावा All India Muslim Jamat च्या अध्यक्ष्यानी केला आहे. अखिल भारतीय मुस्लिम जमातचे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी दावा केला आहे की, ५५ बिघा वक्फ जमीन हिंदू धार्मिक कार्यक्रमासाठी वापरली जात आहे. आपल्या विडिओ मध्ये ते म्हणतात कि, “बघा आम्ही मुस्लिम समाज इतकं मोठं मन दाखवून तुम्हाला आमच्या वक्फच्या जमिनीवर कुंभमेळा साजरा करू देत आहोत. पण तुम्ही मुस्लिम समाजाने तिथे आपली दुकाने लावू नयेत असे हुकूम काढत आहात.’
वायुवेग १०/०१/२५