चीनच्या कुरापतींना अंत नाही

30 Jan 2025 10:36:51
 
     चिनी लष्कराच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) च्या शिनजियांग मिलिटरी कमांडच्या रेजिमेंटच्या नेतृत्वाखाली युद्धसराव करण्यात आला. चीनच्या या लढाऊ कवायतीमध्ये सर्व भूभागावरील वाहने, मानवरहित यंत्रणा आणि ड्रोनसह प्रगत लष्करी तंत्र वापरण्यात आले. भारत आणि चीन शांतता राखण्याचे काम करीत असताना चीनकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. चीनची हा युद्धसराव केवळ प्रशिक्षणाचा भाग नाही. चीन हे धोरणात्मक पद्धतीने करत आहे. वादग्रस्त भागात तो वेगाने सैन्य जमा करत आहे. उदाहरणार्थ, एक्सोस्केलेटनचा वापर केल्याने चीनी सैनिकांना पर्वतीय व बर्फाळ प्रदेशात टिकून राहण्यास मदत होत आहे आणि ते सहजपणे लष्करी सराव करू शकतात. अशा परिस्थितीत भारताने सतर्क राहून लडाखमध्ये लष्करी आधुनिकीकरणाचे प्रयत्न करण्याची गरज आहे. भारतीय लष्कर हिवाळी सरावही करत आहे, चीनकडून होणाऱ्या कोणत्याही संभाव्य हल्ल्याला तोंड देण्यासाठी आपली पाळत ठेवणारी यंत्रणा अधिक मजबूत करत आहे.
नवभारत १४.०१.२५
Powered By Sangraha 9.0