काश्मिरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा

01 Feb 2025 17:35:46
 

        श्रीनगर : जम्मू - काश्मीरच्या पूंछ भागात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव लष्कराने उधळून लावला. यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दहशतवाद्यांचा एक तीन जणांचा गट काश्मिरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर त्यांनी गोळीबार केला. दलाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला. तर तिसरा गोंधळाचा फायदा घेत पाकव्याप्त काश्मिरात पळून गेला.

पुढारी ३१.१.२५

Powered By Sangraha 9.0