३१ नक्षलवादी ठार

10 Feb 2025 14:37:16
 
        छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले. त्यात ११ महिलांचा समावेश आहे. या चकमकीत दोन जवान हुतात्मा झाले असून, अन्य दोघे जखमी झाले, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. या कारवाईमुळे राज्यात यंदा चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या ८१ झाली आहे.
        माओवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र करून सुरक्षा दलांच्या ६५० जवानांनी रविवारी सकाळी इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसर पिंजून काढला. या वेळी सुरक्षा दलांचे जवान आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या कारवाईत जिल्हा राखीव दल, विशेष कृती दल आणि राज्य पोलिसांचे 'बस्तर फायटर्स' पथक सहभागी झाले होते. 'चकमकस्थळावर आतापर्यंत ३१ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. तिथून मोठा शस्त्रसाठा आणि स्फोटकेही जप्त करण्यात आली आहेत,' असे बस्तर क्षेत्राचे पोलिस महासंचालक सुंदरराज पी. यांनी सांगितले. 
महाराष्ट्र टाइम्स १०/०२/२५
Powered By Sangraha 9.0