एका प्रसिद्ध संकेतस्थळाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, देशाच्या विविध भागांमध्ये चर्चशी संधान साधून, ख्रिस्ती धर्मप्रचार आणि प्रसार करण्यासाठीही 'युएसएड'च्या आर्थिक पाठबळावर 'वर्ल्ड व्हिजन' ही संस्था भारतात कार्यरत आहे. 'वर्ल्ड इव्हँजेलिकल अलायन्स' ही त्यांची सहकारी संस्था असून, या संस्थेने ओडिशा राज्यातील गजपती जिल्ह्यातील गुम्मा विभागातल्या ८५ ते ९० टक्के नागरिकांना धर्मांतरण करण्यासाठी गळाला लावले असल्याचेही या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
२०२४ मध्ये जेव्हा उत्तर प्रदेश सरकारने धर्मांतरविरोधी कायदा संमत केला, तेव्हा 'वर्ल्ड काऊन्सिल ऑफ चर्च', 'वर्ल्ड इव्हँजेलिकल अलायन्स' आणि 'वर्ल्ड व्हिजन' यांनी धर्मांतरविरोधी कायद्याविरोधात मोर्चा काढला होता.
मुंबई तरूण भारत ११.२.२५