बिहारमधील फतुहाजवळ असलेले गोविंदपूर येथील नागरिक दहशतीत आहेत. कारण वक्फ बोर्डाने त्यांना गाव खाली करण्याचा आदेश दिलेला आहे. गोविंदपूरमध्ये ९५ टक्के लोक हिंदू आहेत. ते शेकडो वर्षांपासून तेथे राहत आहेत. परंतु, वक्फचे म्हणणे आहे की, गावाच्या पाठीमागे एक मजार आहे आणि हे संपूर्ण गावच त्यांचे कब्रस्तान आहे. याबाबत स्थानीय प्रशासनाला गावकऱ्यांनी विचारले की, "जमीन कोणाची आहे ?" तर प्रशासनाने गावकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला.
पटना उच्च न्यायालयामध्ये जेव्हा हा खटला पोहोचला, त्यावेळेस पटना उच्च न्यायालयाने सुद्धा सांगितले की, ही जमीन गावकऱ्यांची आहे. त्यांनी वक्फ बोर्डाला विचारले की, "तुमच्या जवळ त्या जमिनीचे कागदपत्र आहेत का?" तर वक्फ बोर्ड म्हणाले की, "पूर्वी वक्फ म्हणजे, धर्माच्या नावाने जमीन तोंडी दान दिली जायची. सर्व जमिनीचे कागदपत्र दाखविणे शक्य नाही. फक्त आम्ही म्हणतो आहे म्हणून ही जमीन वक्फ बोर्डाची आहे, असे तुम्ही मान्य करा."म्हणून आता नवीन विधेयकामध्ये तोंडी वक्फवर बंदी घालण्यात आलेली आहे. जो काही व्यवहार करायचा तो कायदेशीर करावा लागेल. दान देणाऱ्याला सगळी कागदपत्र सादर करीत ती जमीन वक्फ बोर्डाला द्यावी लागेल व वक्फलासुद्धा सर्व कायदेशीर प्रक्रिया करूनच ती जमीन त्यांच्या नावावर करुन घेता येईल.
एकता, फेब्रुवारी २५