छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र आणि मराठी भाषा विभाग बळकट करणार

14 Feb 2025 16:36:57
 
               छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र आणि मराठी भाषेशी निगडित संस्थांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र सरकार पावले उचलत आहे. या अनुषंगाने, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र आणि मराठी भाषा विभागाच्या बळकटीकरण करण्यात निधीची कमतरता भासणार नाही, असे राज्य सरकारने बुधवारी जाहीर केले. छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र आणि मराठी भाषा विभागासाठी सरकार पुरेशी मदत करेल, असे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी येथे सांगितले. 

दैनिक भास्कर
१३/०२/२५
Powered By Sangraha 9.0