बांगलादेशाच्या नकाशात अरुणाचल प्रदेश

14 Feb 2025 12:36:22
 
                   पाठ्यपुस्तक बांगलादेशचे, नकाशा आशियाचा आहे, पण भारताचा नकाशा बघून चीनच्या नाकाला मिरची झोंबत आहे. त्यांनी आता बांगलादेश सरकारकडे आपला आक्षेप व्यक्त केला आहे. बांगलादेशचे पाठ्यपुस्तक आणि वेबसाइटवर असणाऱ्या आशियाच्या नकाशावर चीनने आक्षेप घेतला आहे. अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनला भारताचा भाग म्हणून चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचे चीनचे म्हणणे आहे. चीनने बांगलादेशच्या सरकारला पत्र लिहून नकाशे आणि माहिती दुरुस्त करण्याची मागणी केली होती, बांगलादेशने त्वरित कारवाई करण्यास नकार दिला आणि पुनरावलोकनासाठी वेळ मागितला. यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन बांगलादेशने चीनला दिले. यानंतर चीनने होकार दिला.                             अलिकडच्या वर्षांत चीनने भारताच्या कोणत्याही शेजारी देशाकडून अशी मागणी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. चीनने आपल्या पत्रात असेही म्हटले आहे की पाठ्यपुस्तके आणि सर्वेक्षण विभागाच्या वेबसाइटने हाँगकाँग आणि तैवानला चीनचा भाग मानण्याऐवजी वेगळे देश दाखवले आहेत.
                ही देखील एक 'फॅक्चुअल एरर' आहे. चीनच्या म्हणण्यानुसार, इयत्ता चौथीच्या मदरसा पाठ्यपुस्तकात चीन आणि भारत यांच्यातील सीमांचे विशेषत: अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनच्या बाबतीत 'चुकीचे' चित्रण केले आहे. त्याचप्रमाणे, इयत्ता नववी आणि दहावीच्या 'बांगलादेश आणि जागतिक अभ्यास' पाठ्यपुस्तकात, बांगलादेशच्या निर्यात गंतव्यांच्या यादीत हाँगकाँग आणि तैवान स्वतंत्र देश म्हणून दाखवले आहेत.

नवभारत १३/०२/२५
Powered By Sangraha 9.0