बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक आणि मुख्य वनसंरक्षकपदावर अनिता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय उद्यानाच्या संचालकपदावर पहिल्यांदाच भारतीय वनसेवेतील महिला अधिकाऱ्याची पूर्णवेळासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील या २०१०च्या तुकडीच्या अधिकारी असून त्या भारतीय वनसेवेतील महाराष्ट्रामध्ये नेमणूक झालेल्या पहिला महिला अधिकारी आहेत.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालकपदी यापूर्वी पूर्ण वेळासाठी महिला अधिकाऱ्याची नेमणूक कधीच झाली नव्हती. मात्र, आता राज्याच्या सर्वच प्रमुख पदांवर महिला अधिकारी कार्यरत असताना राष्ट्रीय उद्यानाच्या संचालकपदावरदेखील अनिता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी कांदळवन कक्ष विभागात उपवनसंरक्षक तसेच सामाजिक वनीकरण विभागात वनसंरक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.
मुंबई तरुण भारत १३.२.२५