न्यूयॉर्क- इस्लामिक स्टेट (आयएस) ही दशतवादी संघटना भारतात मोठे हल्ले करण्यात निष्प्रभ ठरली आहे. मात्र, 'आयएस'च्या हस्तकांनी स्थानिक साथीदारांच्या मदतीने देशात छोटे हल्ले करण्याचे प्रयत्न केल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे. आयएस, अल कायदा आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्ती व संस्थांचे विश्लेषण आणि निर्बंधांवरील देखरेखीचा ३५ वा अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये 'आयएस'च्या कारवायांबद्दलची माहिती देण्यात आली आहे. पश्चिम आशियात खिलाफत स्थापन करण्यासाठी 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लिव्हेंट' ही दहशतवादी संघटना कारवाया करीत आहे. 'आयएस भारतात मोठ्या स्वरूपातील हल्ले करण्यात निष्प्रभ ठरली आहे. मात्र, तिच्या हस्तकांनी भारतातील साथीदारांच्या मदतीने एकल हल्ले करण्याचे प्रयत्न केले आहेत. 'आयएस' समर्थक 'अल जौहर' या संघटनेने 'सेरत उल-हक' या प्रकाशनामार्फत भारतविरोधी अपप्रचार सुरू ठेवला आहे,' असेही या अहवालात म्हटले आहे.
आयएस'कडून आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला असलेला धोक्याबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांनी दुसऱ्या अहवालात या दहशतवादी संघटनेचा धोका कायम असल्याचे म्हटले आहे. याबाबतचा त्यांचा हा २०वा अहवाल आहे.धोका कायम
'
महाराष्ट्र टाईम्स १७.२.२५