शंखध्वनी आणि वैदिक मंत्रोच्चारांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

19 Feb 2025 14:36:57
 
               डेहराडून - देवभूमी उत्तराखंड इथे ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा २८ जानेवारी २५ रोजी शुभारंभ झाला. शंखध्वनी आणि वैदिक मंत्रोच्चारांनी  या स्पर्धेचे उद्घाटन झाले. या स्पर्धेची संकल्पना ' ग्रीन गेम्स' अशी होती. यात बक्षीस म्हणून देण्यात येणारी पदके इ-कचऱ्यातून तयार करण्यात आली. सर्व विजेत्यांच्या नावाने एकेक रोप लावण्यात आले. 
                 या स्पर्धेच्या आयोजनात सौरउर्जेचा जास्तीत जास्त वापर केला गेला. प्लॅस्टीकचा वापर टाळण्यात आला. या स्पर्धेत यंदा योगासने, कबड्डी, खो-खो आणि मल्लखांब यांचा प्रथमच समावेश करण्यात आला.
              
पाथेय कण १६.२.२५
Powered By Sangraha 9.0