अधिकृतरीत्या समजू शकली नव्हती. या हिवाळ्यात सुरक्षा दलांनी ३० दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले होते; तर २५ जवान शहीद झाले होते. सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये ७० ते ८० दहशतवादी कार्यरत आहेत. त्यातील ५५ ते ६० दहशतवादी जम्मू विभागात आहेत, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
दि. ४ फेब्रुवारीच्या रात्री पूंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी परिसरात दहशतवाद्यांनीच पेरलेल्या भू सुरुंगाच्या स्फोटात दहशतवादी मरण पावले होते. मात्र त्यांची नेमकी संख्या
नवी दिल्ली - भारतीय चौकीवर पाकिस्तानी सैन्याने रविवारी गोळीबार केला. त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. पूंछ जिल्ह्यात रविवारी सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. पूंछ क्षेत्रातील नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्याने सडेतोड उत्तर दिले. भारतीय जवानांची कोणतीही जीवित हानी झाली नाही, असे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. राजौरीच्या केरी विभागात दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कराच्या गस्तीपथकावर गोळीबार केला होता. त्यालाही लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले.
पुढारी १७.२.२५