मुंबई उच्च न्यायालयाची 'वक्फ' बोर्ड आणि मुस्लीम गटांना 'कारणे दाखवा' नोटीस

20 Feb 2025 12:36:29
 
     कानिफनाथ महाराज देवस्थान प्रकरणात हिंदू भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने देवस्थान प्रकरणात मुस्लीम गटांना आणि महाराष्ट्र वक्फ बोर्डाला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे.
     संत कानिफनाथ महाराज हे नाथ संप्रदायातील एक महान संत होते. त्यांनी राहुरी तालुक्यातील गुहा येथे कठोर तपश्वर्या आणि ध्यानसाधना केली होती. त्यामुळे हे ध्यानस्थळ हिंदू भाविकांसाठी श्रद्धेचे ठिकाण आहे. येथे पूजाअर्चा, आरती व धार्मिक विधी पार पडतात. मात्र, काही मुस्लीम गटांनी आणि 'महाराष्ट्र वक्फ बोर्डा' ने मिळून या स्थळाला 'हजरत बाबा रमजान शहा दर्गा' असल्याचा दावा केला. महसुली अभिलेखांमध्ये फेरफार करून या स्थळावर मुस्लिमांची मालकी असल्याचा प्रयत्न करण्यात आला.
      या प्रकरणात गुहा ग्रामपंचायत आणि 'महाराष्ट्र मंदिर महासंघा'चे स्थानिक पदाधिकारी अन् भाविक यांच्यावतीने 'हिंदू जनजागृती समिती'चे अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांनी प्रभावी युक्तिवाद - केला. "हा न्यायालयाचा आदेश हिंदू धार्मिक हक्कांचे संरक्षण करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. असे 'महाराष्ट्र मंदिर महासंघा'ने म्हटले आहे.
तरुण भारत १९/०२/२५
Powered By Sangraha 9.0