महाकुंभात हिंदु राष्ट्र आणि सनातन बोर्ड (मंडळ) यांची स्थापना करण्याची मागणी जोर धरल्यानंतर आता भारतात भगवान श्रीरामाची मुद्रा असलेल्या नोटा चलनात आणाव्यात, अशी मागणी येथील महर्षी योगी संस्थेने केली आहे.
नेदरलँड्समध्ये श्रीरामाचे छायाचित्र डिझाईन करून ते चलनात आणण्यासाठी ' द ग्लोबल कंट्री ऑफ वर्ल्ड पीस'ला सहकार्य केले होते, त्या संस्थेने या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.
श्रीरामाचे चित्र असलेलेहे चलन हॉलंड, जर्मनीसह ३० देशांमध्ये वापरले होते. राममुद्रा प्रथम नेदरलँड्समध्ये छापली गेली. १० डॉलरच्या समान १ राममुद्रेची किंमत ठेवली गेली. त्यानंतर राममुद्रा हॉलंड, जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलियासह ३० देशांमध्ये चालली.
सनातन प्रभात १७.२.२५