जोशुआ प्रोजेक्ट आणि छुपे धर्मांतरण

21 Feb 2025 10:35:38
 
      जोशुआ प्रोजेक्ट अंतर्गत भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी ख्रिस्ती धर्मांतर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काही ठिकाणी हे "सोल हार्वेस्टिंग" नावाने खुलेआम चालते, तर काही ठिकाणी सामाजिक सेवा, शिक्षण, आणि आरोग्यसेवेच्या नावाखाली गुप्तपणे हा प्रकार घडतो. विशेषतः गरीब आणि वंचित घटकांना लक्ष्य करून, आर्थिक मदत आणि उपचाराच्या माध्यमातून त्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त केले जाते.
     याच दरम्यान "सोल हार्वेस्टिंग" या धोरणाचा एक धक्कादायक नमुना पुण्यातील कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल येथून समोर आला आहे. शासकीय रुग्णालयाच्या आतच धर्मांतराच्या घटना घडत असल्याने हा प्रकार किती खोलवर रुजला आहे, याचा अंदाज येतो. त्यामुळेच कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल ख्रिश्चन मिशनरींचा अड्डा बनले आहे का? पुणे ख्रिश्चन धर्मप्रसाराचे माहेरघर झाले आहे का? या रुग्णालयाला धर्मांतरासाठी पाठबळ मिळते का? असे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, "सोल हार्वेस्टिंग" म्हणजे एखाद्या व्यक्तीला तिच्या मूळ धर्म आणि विचारांपासून पूर्णपणे तोडून तिचे धर्मांतरण करणे. यामध्ये प्रामुख्याने मानसिक, सामाजिक आणि भावनिक दबाव टाकला जातो. गरीब, मागास, तसेच शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधींचा अभाव असलेल्या लोकांना लक्ष्य केले जाते आणि त्यांना मदतीच्या नावाखाली त्यांच्या मूळ संस्कृतीपासून दूर केले जाते.
     माहिती साठी इस्लामप्रमाणे येथे बळजबरी केली जात नाही, तर सोल हार्वेस्टिंगमध्ये लोकांच्या भावनांशी खेळले जाते आणि हळूहळू त्यांचे धर्मांतर घडवले जाते. यामध्ये भावनिक, सामाजिक आणि मानसिक प्रभावाचा वापर करून व्यक्तीला तिच्या मूळ धर्म आणि संस्कृतीपासून तोडले जाते. प्रथम त्यांना सहानुभूती आणि मदतीच्या नावाखाली जवळ केले जाते, आणि नंतर त्यांच्या विचारांमध्ये हळूहळू बदल घडवला जातो. स्वर्ग, मोक्ष, चांगले आयुष्य, दैवी कृपा यासारखी प्रलोभने दाखवून त्यांच्या मानसिकतेवर नियंत्रण मिळवले जाते.
     ही एक योजनाबद्ध प्रक्रिया आहे, जिथे सहजपणे आणि हळूहळू मानसिक परिवर्तन घडवून धर्मांतरण केले जाते, ज्यामुळे संबंधित व्यक्तीला हे कधीच सक्ती वाटत नाही. सोल हार्वेस्टिंग हा केवळ धार्मिक धर्मांतरणाचा विषय नाही, तर तो एक मोठा उद्योग आणि आर्थिक फायदा मिळवण्याचा मार्ग देखील आहे. ज्या व्यक्तीने जितके जास्त लोकांचे धर्मांतर केले, त्याला तितके जास्त फंड मिळतात. आणि साठी परदेशी संस्था आणि संघटना मोठ्या प्रमाणावर अनुदान (फंडिंग) देतात, जेणेकरून धर्मांतराची गती वाढेल.

वायुवेग १८/०२/२५
Powered By Sangraha 9.0