मुंबईत ‘हाऊसिंग जिहाद’च्या माध्यमातून हिंदूंना अल्पसंख्यांक बनवण्याचे षडयंत्र :संजय निरुपम

24 Feb 2025 12:36:02
 
शिवसेना (शिंदे गट) उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम म्हणाले की, मुंबईतील जोगेश्वरी येथे सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांमध्ये 'हाउसिंग जिहाद'च्या माध्यमातून हिंदूंना अल्पसंख्यांक बनवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. निरुपम यांनी जोगेश्वरी (पश्चिम) येथील श्री शंकर एसआरए प्रकल्प आणि ओशिवरा पॅराडाईज १ आणि २ प्रकल्पांची त्वरित चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. 
     अल्पसंख्यांक डेव्हलपर्सनी हिंदू रहिवाशांना अल्पसंख्यांक आणि अल्पसंख्याकांना बहुसंख्यांक बनविण्याचे षडयंत्र सुरू केले आहे, असे निरुपम म्हणाले. ते असंही म्हणाले की, काही बांधकाम व्यावसायिक एसआरए अधिकाऱ्यांच्या संगनमताने अल्पसंख्यांक लोकांच्या नावावर झोपडपट्ट्यांची बेकायदेशीर नोंदणी करतात. शास्त्रीनगरमधील श्री शंकर एसआरए प्रकल्पात फक्त ६७ रहिवासी आहेत. त्यापैकी ७ अल्पसंख्यांक रहिवासी होते. मात्र आता त्यांची संख्या वाढली आहे.
दैनिक भास्कर २२/०२/२५
Powered By Sangraha 9.0