तुर्कस्तानच्या काश्मीर वक्तव्यावरून भारताने त्याची बोलती बंद केली.

24 Feb 2025 17:36:05
 
काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानच्या भूमिकेचे समर्थन करणाऱ्या राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांच्या वक्तव्यावर भारताने तुर्कस्तानचा निषेध केला आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर एर्दोगन पाकिस्तानच्या भाषेत बोलत आहेत, जे योग्य नाही, असे भारताने तुर्कस्तानला सांगितले आहे. काश्मीर प्रश्न पूर्णपणे द्विपक्षीय असून त्याचे आंतरराष्ट्रीयीकरण होऊ दिले जाऊ शकत नाही, असे भारताने स्पष्ट केले आहे. काश्मीर प्रश्नावर आपली भूमिका बळकट करण्यासाठी पाकिस्तान, तुर्कस्तानचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणून भारताने एर्दोगन यांना त्यांच्या भूमिकेबद्दल सावध केले आहे.
         एर्दोगन यांनी अलीकडेच पाकिस्तानला भेट दिली. इस्लामाबादमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी चर्चा केल्यानंतर एर्दोगन यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, "संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरमधील लोकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन काश्मीर प्रश्नावर तोडगा काढायला हवा. भूतकाळाप्रमाणे आजही आपला देश आपल्या काश्मिरी बांधवांसोबत एकजुटीने उभा आहे."
          यावर भारताने तुर्कस्तानने, पाकिस्तानची भाषा करू नये, असे स्पष्ट केले आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहेत, असा भारत सातत्याने आग्रह धरत आहे. भारत हा द्विपक्षीय मुद्दा मानतो आणि काश्मीरबाबत तिसऱ्या देशाची टिप्पणी नाकारतो. याआधीही भारताने एर्दोगन यांच्या काश्मीरबाबतच्या वक्तव्यावर आक्षेप व्यक्त केला आहे. 

नवभारत २२/०२/२५
Powered By Sangraha 9.0