भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी आपल्या रविवार दि.२३.२.२५ रोजी प्रसारित झालेल्या 'मन की बात' मध्ये सांगितलेले काही महत्वाचे मुद्दे :
१.भारताने 'एआय' (artificial intelligence) मध्ये केलेली प्रगती विलक्षण आहे.याचं पद्धतीने देशाने विज्ञानातील संशोधनावरदेखील भर द्यायला हवा, त्याकरिता मुलांनी 'एक दिवस सायंटिस्ट व्हा' असे आवाहन त्यांनी केले. त्यासाठी आपल्या शाळेतील प्रयोगशाळा, विज्ञान भवन यासारख्या गोष्टीना भेट देण्यास त्यांनी सांगितले.
२.येत्या ८ मार्च रोजी होणाऱ्या महिला दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान त्यांची सोशल मिडीया खाती विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांच्या हाती सोपवणार आहेत. महिला त्यांचे कार्य, त्यांचे अनुभव या खात्यांद्वारे समाजासमोर मांडू शकतात.. एक्स,यु ट्युब आणि इन्स्टाग्राम यासारख्या समाजमाध्यमांवर मोदी यांचे लाखो फॉलोअर्स आहेत, त्याचा फायदा महिलांना होऊ शकणार आहे.
३.संपूर्ण जगात आजकाल वाढते वजन ही मोठी समस्या बनली आहे. त्यावर एक उपाय म्हणून नागरिकांनी आपल्या आहारात तेलाचे प्रमाण दहा टक्क्यांनी कमी केले पाहिजे असे आवाहन पंतप्रधानांनी नागरिकांना केले.
सकाळ २४/०२/२५