राहुल गांधी यांनी शिवजयंती असतांना 'विनम्र अभिवादन' करण्याऐवजी छत्रपती शिवरायांना वाहिली 'श्रद्धांजली'!

25 Feb 2025 12:36:42
 
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १९ फेब्रुवारी या दिवशीच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी 'एक्स' वर छत्रपती शिवाजी महाराजांना 'श्रद्धांजली' वाहिली आहे.
         जेव्हा एखाद्या राष्ट्रपुरुषाची जयंती असते, त्या वेळी त्यांना 'विनम्र अभिवादन' केले जाते. हा सामाजिक नियम आहे. 'श्रद्धांजली' पुण्यतिथी असतांना वाहिली जाते. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. भाजपने त्यांच्यावर टीका करत सांगितले, 'शिवजन्मोत्सवाच्या दिवशी राहुल गांधी यांनी जाणूनबुजून छत्रपती शिवरायांना श्रद्धांजली वाहण्याचा विकृतपणा दाखवला आहे. महापुरुषांचा केवळ राजकीय लाभासाठी वापर करणे, ही काँग्रेसची घाणेरडी मानसिकता नेहमी जनतेसमोर उघड होते. या शिवद्रोही काँग्रेसला तमाम हिंदु बांधव कधीही क्षमा करणार नाहीत."
            राहुल गांधी यांनी प्रसारित केलेल्या पोस्टमधील छायाचित्रात ते शिवरायांची पूर्णाकृती मूर्ती हातात धरून उंचावून दाखवतांना दिसत आहेत. त्यांनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो आणि विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांनी शौर्य आणि साहस यांद्वारे आपल्याला निर्भीडपणा अन् समर्पणाने आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. त्यांचे आयुष्य आपल्या सर्वांसाठी कायमच प्रेरणास्रोत राहील."
सनातन प्रभात २०/०२/२५
Powered By Sangraha 9.0