नवापूरमध्ये बेकायदेशीर चर्चची वाढ : आदिवासींसाठी धोका

26 Feb 2025 12:36:53
 

महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्याच्या मध्यभागी अत्यंत शांततेत एका गोष्टीचं आक्रमण सुरू आहे. यामुळे स्थानिक आदिवासी लोकसंख्येची सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख पुसून टाकण्याचा धोका आहे. अनधिकृत बांधकामे केवळ जमिनीवर नव्हे तर फसवणुक करून बांधली गेली आहेत. अतिक्रमित आदिवासी आणि सरकारी जमिनीवर कोट्यवधी रुपयांचे बेकायदेशीरपणे उभारल्या गेलेले चर्च केवळ इमारती नाहीत तर त्या आक्रमक, अनियंत्रित विस्ताराचे प्रतीक आहेत.

       धर्मादायतेच्या नावाखाली, परकीय निधीतून चालणारे मिशनरी गट चमत्कार आणि तारणाचे खोटे आश्वासन देऊन भोळ्या आदिवासींच्या असुरक्षिततेचा फायदा घेत आहेत आणि असे करून या आदिवासी समुदायांना धर्मांतराच्या एका व्यवस्थित जाळ्यात ओढले जात आहे.

       गेल्या ८-१० वर्षांत, ११६ ग्रामपंचायतींमध्ये कोट्यवधी रुपयांचे बेकायदेशीर चर्च उदयास आले आहेत, त्यापैकी अनेकांनी आदिवासींच्या जमिनी, शेती नसलेल्या भूखंडांवर आणि अगदी सरकारी मालमत्तेवर अतिक्रमण केले आहे. तेथे ख्रिश्चन मिशनरी कार्यात लक्षणीय वाढ झाली आहे. २०० हून अधिक चर्च आणि ८६ मिशनरी संघटना आहेत, ज्यात प्रोटेस्टंट, कॅथोलिक आणि मेथोडिस्ट शाखांचा समावेश आहे. धर्मांतरात सक्रियपणे सहभागी असलेल्या ख्रिश्चन मिशनरींची उपस्थिती भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीही दिसून येते, त्यांच्या सुरुवातीच्या कारवाया १९ व्या शतकात सुरू झाल्या होत्या.

       १९०७ पर्यंत, मिशनऱ्यांनी अशी नोंद केली की १०,००० हून अधिक भिल्ल धार्मिक मार्गदर्शनासाठी त्यांच्यावर अवलंबून राहू लागले. या खोलवर रुजलेल्या प्रभावामुळे हळूहळू पारंपरिक आदिवासी जीवनशैली नष्ट झाली, ज्यामुळे त्यांच्या सांस्कृतिक ओळखीत मोठा बदल झाला. पिढ्यानपिढ्या जतन केलेले स्थानिक रीतिरिवाज, श्रद्धा आणि प्रथा मिशनरी लोकांकडून केल्या जात असलेल्या विविध गोष्टींखाली आणि त्यांच्या वाढत्या प्रभावाखाली नाहीशा होऊ लागल्या. 

वायुवेग २५/०२/२५

 

Powered By Sangraha 9.0