२८ फेब्रुवारी हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो. आणि २०१५ पासून ११ फेब्रुवारी हा दिवस 'आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिन' म्हणून साजरा केला जातो. या दोनही दिवसांचे औचित्य साधून जाणून घेऊ तीन महिला वैज्ञानिकांबद्दल :मूळची नवी दिल्ली येथील पण कोलकाता येथे शिक्षणासाठी असलेली डॉ.मुक्ता बासू
शरीरविज्ञानातील असलेली रूची म्हणून मुक्ता हिने त्यात पदवी घेतली, यादरम्यान तिची विज्ञानातील आवड जी वाढत गेली ती पदव्युत्तर शिक्षणा दरम्यान अधिकच वाढत गेली. 'पी.एचडी' साठी कोलकाता येथील चित्तरंजन राष्ट्रीय कर्करोग संस्थेमध्ये पेशी विज्ञानातील संशोधनासाठी (Research in cellular biology) तिला प्रवेश मिळाला. आणि ती कर्करोगावर संशोधन करू लागली. तेव्हा तिला यातील क्लिष्टतेची आणि संशोधनाची गरज लक्षात आली. सध्या ती अमेरिकेतील लॉस एंजलिस येथील सेडार्स- सिनाई मेडिकल सेंटर येथे पोस्ट डॉक्टरेट अंतर्गत मूत्राशयाच्या कर्करोगावर 'इम्युनोथेरपी' या माध्यमातून उपचार करण्यासाठी संशोधन करत आहे.