असमिया (आसामी) भाषेतील रामायण

28 Feb 2025 12:36:15
 
     भारताच्या पूर्वोत्तर प्रदेशातील आसाम हे प्राचीन राज्य आहे. महाभारत काळी या राज्याची राजधानी  'प्रागज्यातिषपूर' ही होती. असुरांचा राजा नरकासुर याचा श्रीकृष्णाद्वारे वध करून बंदिवासातील हजारो स्त्रियांची मुक्तता केली ती इथेच. इतिहास काळात येथे वर्मन, शालस्तंभ, अहोम या राजघराण्यांनी राज्य केले. मुघल बादशहांनी अनेकवेळा आसामवर आक्रमणे केली पण त्यांना आसाम जिंकता आले नाही. त्यामुळे आसाम हा मुघलांचे धर्मांध पाय न लागलेला प्रदेश आहे. 
    अशा या आसाम राज्यात १४ व्या शतकात माधव कंदली नावाचे विद्वान कवी होऊन गेले. ते थोर तत्वज्ञ, चिंतक होते. त्यांना 'राजकवी' म्हणून ओळखले जात असे. माधव कंदली यांनी आसामी भाषेत रामायण हे महाकाव्य लिहिले. या रामायणाला 'माधव कंदली रामायण' तसेच 'असमिया रामायण' म्हणून ओळखले जाते.ते रामाला मानव न मानता विष्णूचा सातवा अवतार मानत. आणि त्याचं अनुषंगाने त्यांनी रामायणातले प्रसंग रंगवले आहेत. त्यांनी सात कांड लिहिली पण आज त्यातली पाच कांड उपलब्ध आहेत.
मुं.त.भा १६.२.२५.       
Powered By Sangraha 9.0